Nitesh Malap

“हरिशचंद्राची फॅक्टरी” – एका अनुभवाचा अनुभव…

Posted by: niteshmalap on: January 30, 2010

२००४ च्या “श्वास्” या चित्रपटानंतर ऑस्करसाठि पाठवलेला हा दुसरा चित्रपट. या चित्रपटात तसा ओळखीचा चेहरा कोणी फारसा नाही, पण ज्यांनी भारताला चित्रपटनिर्मितीची -ओळख करुन दिली अशा दादासाहेब फाळकेंच्या जीवनावर आधारित असलेला हा “हरिशचंद्राची फॅक्टरी” आज प्रदर्शित होणार आहे. दादासाहेब फाळके हे भारतीय सिनेसृष्टीचे पिता मानले जातात. “हरिशचंद्राची फॅक्टरी” हा आपल्याला बॉलिवुडचा जन्म कसा झाला याची गोष्ट सांगतो. भारताचा पहिला चित्रपट “राजा हरिशचंद्र (१९१३)” हा कसा तयार केला गेला याची कहानी, इथे पहायला मिळते. तसेच या चित्रपटाने प्रदर्शित होन्या अगोदरच भरपुर बक्षिसे आणि मनं जिंकलेली आहेत.

१९१३ साली “राजा हरिशचंद्र” हा सिनेमा प्रदर्शित झाला. तो सिनेमा तयार करताना आणि तो तयार करण्यासाठी दादासाहेबांना कोणत्या गोष्टिंचा सामना करावा लागला, कोणी सहकार्य केले, इत्यादि गोष्टि पहायला मिळतात. त्यांना आलेल्या आर्थिक समस्या, प्रश्न, तांत्रिक गोष्टिंची अडचण, इ. त्यांनी कशा प्रकारे सोडवल्या आणि तो चित्रपट बनवला. अखंड भारत स्वातंत्र्यापाठी धावत असताना त्या दादसाहेबांना चित्रपट बनवन्याची कल्पना सुचते काय आणि ते त्या कल्पनेमागे धावतात काय. त्यात त्यांची पत्ऩि आणि त्यांची मुल त्यांना सहकार्य करतात. आणि तयार होतो “राजा हरिशचंद्र”, भारताचा पहिला चित्रपट.

दादासाहेब फाळकेंच्या भुमिकेत नंदु माधव, यांनी एक वेगळी प्रतिमा मांडली आहे. नंदु माधव आणि विभावरी देशपांडे (सरस्वती फाळके) हे या चित्रपटाचे दोन आधारस्तंभ आहेत, आणि त्यानी ती जवाबदारि अत्यंत उत्तमरित्या पार पाडली आहे. चित्रपट पाहताना आणखी एक मजा म्हणजे या चित्रपटाचे नेपथ्यकार नितिन देसाई आहेत, त्यामुळे त्यांनी या अगोदरही “मंगल पांडे ” मधून १८५७ च्या भारताचे दर्शन दिले होते आणि आता “हरिशचंद्राची फॅक्टरी” मधून १९१३ चा भारत पहायला मिळतो. बालकलाकारांचेहि काम अगदि छान आहे.

दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन सुद्धा त्यांनीच केले आहे.या अगोदर त्यांनी मराठी नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपट ऑस्करच्या यादित का नाहि झळकला, ते सांगन थोड कठीण आहे…

Advertisement

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.