Nitesh Malap

मराठी नाटकाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, मराठी नाटकं आणि चित्रपट नवीन कोणती आहेत माहित नाहि पडत, येत्या रविवारि गडकरिला कोणत नाटक आहे ? अशा अनेक ई-मेल्सला काय उत्तर द्यायचे तेच कळत नव्हते. या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधन्यासाठी आम्ही गेल्या काही महिन्यापुर्वी एक ई-मेल सर्वे केला होता. त्या सर्वेचा मराठीथिएटर.कॅामच्या टिमने अभ्यास केला आणि काही योजना आखण्याचा निर्णय मराठीथिएटर.कॅामने घेतला.

मराठी नाटकांची जाहिरात होते ती फक्त वृत्तपत्रांद्वारे. टि.व्हि. आणि रेडिओवर फारच कमी. काही नाटकांनी वेबसाईटद्वारे प्रमोशन केले आहे, पण वेबसाईटची जाहिरात होते ती सुद्धा वृत्तपत्रात. त्यात वेबसाईट बनवणे सगळ्याच निर्मात्यांना परवडेलच अस नाही. तर अशा काही गोष्टि लक्षात घेउन मराठीथिएटर.कॅाम  मराठी नाटकांच ऑनलाइन प्रमोशन ही आनलाईन सेवा तयार केली आहे.

मराठी नाटकांच ऑनलाइन प्रमोशन या सेवेमधे आम्ही प्रमुख तीन गोष्टींचा समावेश केला आहे.

ई-मेल मार्केटिंग

या सेवेमधे मराठीथिएटर.कॅाम मराठि नाटकांच्या जाहिराती ई-मेल्सद्वारे केल्या जातील. मराठीथिएटर.कॅामचे ई-मेल्स हजारोंच्या संख्येने पाठवले जातात आणि ती संख्या वाढतच आहे. ई-मेल्सद्वारे आम्ही वाचकांना नाटकाबद्दलची माहिती नाटक येण्या अगोदर आणि नाटक आल्यावरहि कळवू. ई-मेल्सद्वारे नाटकाचे पोस्टर  आणि नाटकाच्या वेळापत्रकाची जाहिरात आठवडयातून एकदा तसेच प्रयोगाच्या एक दिवस अगोदर करण्यात येइल. उदाहरणासाठि खालील लिंकवर क्लिक करा. click here

वेब बॅनर ऑन मराठीथिएटर.कॅाम

या सेवेमधे नाटकाचीजाहिरात किंवा नाटकाचा पोस्टर मराठीथिएटर.कॅाम या वेबसाईटच्या उजव्या बाजुस असलेल्या भागात दाखविण्यात येईल. जाहिरातीला एक लिंक जोडण्यात येईल. जर नाटकाची स्वतंत्र वेबसाईत असेल तर ती लिंक वेबसाईटला जोडन्यात येइल जेणे करुन नाटकाच्या वेबसाईटचे सुद्धा प्रमोशन करण्यात येईल. जर नाटकाची वेबसाईत नसेल तर मराठीथिएटर.कॅामतर्फे एक पेज बनवण्यात येईल ज्यामधे नाटकाची संपूर्ण माहिती असेल.

ऑनलाईन तिकिट बुकिंग

या सेवेमधे नाटकाच्या तिकिट विक्रिची जाहिरात मराठीथिएटर.कॅामच्या ऑनलाईन तिकिट्स या वेबसाईटवर करण्यात येईल. नाटकाच्या तिकिटविक्रिचा मोबाईल नंबर जसा वृत्तपत्राच्या जाहिरातीत दिला जातो तोच नंबर येथे देण्यात येईल. पण त्याच बरोबर तिकिट बुक करणारा व्यक्तीस सिटींग अरेंजमेंट दाखवण्यात येईल. जेणे करुन आपली सिट निवडन सोप होईल.

मराठीथिएटर.कॅाम ही वेबसाट गेली दोन वर्ष चालु आहे आणि आम्ही आमच्या युजर्सना मराठी नाटक आणि सिनेमाबद्दलच्या घडामोडि देतच असतो. त्याच बरोबर मराठीथिएटर.कॅामने हल्लीच प्रदर्शित झालेल्या “रिटा” या चित्रपटाचे ऑनलाईन प्रमोशन केले होते. तसेच मराठि एकांकिका स्पर्धा “कलाराग” याचे सुद्धा प्रमोशन केले होते. मराठीथिएटर.कॅामची “ऑनलाईन प्रमोशन” हि सेवा सर्वच निर्मात्यांना परवडेल आणि फायद्यात पडेल अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे.

नाटकाच्या प्रमोशनसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क : नितेश मालप ९८३३ ९३० ९९०

आम्हाला या ई-मेल वर संपर्क करा – promotion@marathitheatre.com